ती करते मिठ्या मारण्याचा व्यवसाय ; आकारते एवढे शुल्क 

कान्सास (अमेरिका) : वृत्तसंस्था – हाताची आणि तोंडाची रोजच्या रोज गाठ पडावी आणि आपली पोटे भरावी म्हणून माणसे अनेक खटपटी करत असतात. मात्र तुम्ही ऐकून आणि वाचून थक्क व्हाल असा व्यवसाय एक महिला करते आहे. अमेरिकेतील कान्सास शहरात राहणारी रॉबिन स्टीन हि महिला चक्क लोकांना मिठ्या मारण्याचा व्यवसाय करत आहे. ‘टच थेरपी’  असे या महिलेने आपल्या व्यवसायाला नाव दिले असून ‘टच थेरपी’ मुळे लोकांचा ताणतणाव कमी होतो असा या महिलेचा दावा आहे. ‘प्रोफेशनल कडलिस्ट’ म्हणून रॉबिन स्टीन हि महिला अमेरिकाभर प्रसिद्ध आहे.

एक तास मिठी मारण्याचे शुक्ल एवढे आहे 
रॉबिन स्टीन हि महिला एक तास मिठी मारून बसण्यासाठी ८० डॉलर एवढे शुल्क आकारले जाते. ८० डॉलरची भारतीय चलनात किंमत हि ५ हजार रुपये एवढे होते. हि थेरपी कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त चार तास चालते. याचाच अर्थ असा होतो कि रॉबिन स्टीन हि महिला एका महिन्याला लाखो रुपयांची कमाई करते.

मिठी मारण्याची असते शास्त्रीय पध्द्त 
रॉबिन स्टीन हि महिला जी कृती करते त्याला शास्त्रीय भाषेत कडलिंग किंवा स्नगलिंग असे म्हणतात. रॉबिन स्टीन हि महिला कोणाला उत्तेजना जागृत होईल अशा मिठ्या मारत नाही. मिठी मारण्याची त्यांनी मानसशास्त्रावर आधारित पध्द्ती विकसित केली असून त्या पध्दतीद्वारेच त्या मिठी मारतात. या थेरपीसाठी त्यांनी स्वतःची एक वेबसाईट विकसित केली आहे. त्यावर नोंद  करणाऱ्या व्यक्तीलाच वेळ देऊन मिठी मारण्यासाठी बोलावले जाते.

तणाव दूर होण्यास होतोय मिठीचा उपयोग 
आपल्या रोजच्या जगण्यात ताणतणाव निर्माण होत असतात हे तणाव हलके करण्याची लोकांची वेगवेगळी साधने असतात. काही लोक तर तणाव घालवायला मद्य प्राशन करतात. मात्र मिठीत राहण्याने तुमचा ताण तणाव हलका होईल असा दावा या थेरीपच्या उद्गाती महिला करते आहे. ‘टच थेरपी’ सुरु असताना हि महिला संबधित व्यक्तीशी गप्पा हि मारते आणि त्या व्यक्तीचे म्हणणे हि ऐकून घेते.

या वयाच्या लोकांना मारली जाते मिठी
रॉबिन स्टीन या महिलेने थेरपीसाठी येणाऱ्या व्यक्तींची वयोमर्यादा निश्चित केली आहे. वय वर्ष १७ ते ७० वर्षापर्यंत व्यक्ती हि थेरपी घेण्यासाठी येऊ शकतात. फक्त पुरुषच टच थेरपीसाठी येत नसून महिला सुद्धा हि थेरपी घेण्यासाठी येतात. रॉबिन स्टीन या आठवड्यातून ४५ तास या टच थेरपी साठी देत असतात. या सर्व उपक्रमाला त्यांच्या नवऱ्याचा हि पाठींबा आहे.