PM मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘या’ रेल्वे स्थानकात केवळ 2 प्रवासी !

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी ओडिशाच्या बिछुपाली-बालंगीर रेल्वे मार्गावरील बिछुपाली या नव्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले होते. मात्र, या रेस्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या पाहून आश्चर्य़ वाटेल. मागील गेल्या वर्षभरात या रेल्वे स्थानकावरून दिवसाला केवळ दोन प्रवासी प्रवास करतात. यातून भारतीय रेल्वे प्रशासनाला केवळ दिवसाचे वीस रुपये मिळतात. तर या रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापनासाठी दर महिन्याला 3.5 लाख रुपये खर्च येत असल्याचे समजतेय.

हेमंत पांडा यांनी यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या याचिकेतून ही आकडेवारी समोर आली आहे. पांडा यांनी बिछुपाली रेल्वे स्थानकासाठी झालेला एकूण खर्च आणि सध्या या स्थानकातून होणारी कमाई, याची आकडेवारी माहिती अधिकारातून मागवली. मात्र, रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर होत असलेल्या खर्चाची आकडेवारी देणं टाळलं. सुत्रांच्या माहितीनुसार या रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाला दर महिन्याला 3.5 लाख रुपये एवढा खर्च येतो.

रेल्वे स्थानक उभारण्यासाठी एवढा आला खर्च
बिछुपाली रेल्वे स्थानक आणि बिछुपाली-बालंगीर रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी एकूण 115 कोटी रुपयांचा खर्च आला. या मार्गावरून सध्या केवळ दोन पॅसेंजर धावत असून यामध्ये बिछुपाली रेल्वे स्थानकावर दिवसामागे केवळ दोन प्रवासी या सेवेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
प्रवासी वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न

बालंगीर ते खुर्दापर्य़ंतचा रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल, असा दावा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी संबित नायक यांनी केला आहे. तसेच संबलपूर आणि टिटलागड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यानंतर सध्याची पॅसेंजर ट्रेन संबलपूरपर्यंत धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्या अगोदरच त्याचे आर्थिक मुल्यमापन करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/