लज्जास्पद ! ‘हा’ रॅपर आपल्या 16 वर्षांच्या मुलीसोबत करतो ‘अशी’ हरकत, स्वत:च केला खुलासा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  हॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर क्लिफर्ड जोसेफ हॅरिस ज्युनियर ज्यांना टी आय म्हणून ओळखलं जातं त्यांना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. सिंगर टीआयनं एका चॅट शोदरम्यान सांगितलं की, त्यांची मुलगी आता 18 वर्षांची झाली आहे. टीआय प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलीचं हायमेन चेक करून घेतात. यासाठी ते तिला गायनॅकलॉजिस्टकडेही नेतात. त्यांना जाणून घ्यायचं असतं की, मुलगी व्हर्जिन आहे किंवा नाही. टीआयनं पुढं सांगितलं की, ते पॅरेंटींग बद्दल बोलत होते. याचवेळी त्यांनी सांगितलं की, त्यांनी एकदा मुलीसोबत सेक्सबद्दल बाचतित केली होती. जेणेकरून तिला याविषयी माहिती मिळेल.

त्यांनी यावेळी सांगितलं ते मुलगी डेजाह हॅरिस हिला प्रत्येक वर्षी गायनॅकलॉजिस्टकडे नेतात आणि तिचं हायमेन चेक करून घेतात. जेव्हा ती 16 वर्षां झाली होती तेव्हाही वाढिदवसाच्या दिवशी त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं होतं. सिंगरनं असाही खुलासा केलाय की, त्यांच्य्या मुलीनं एक डॉक्युमेंट साईन केलं आहे ज्यावर लिहिलंय की, डेजाहचे मेडिकल रिपोर्ट्स आणि स्थिती त्यांच्यांसोबत शेअर करणार गरजेचं असणार आहे. सिंगनं पुढं सांगितलं की, हायमेन पेनिट्रेशन व्यतिरीक्त इतर फिजिकल अ‍ॅक्टीविटीमुळंही ब्रेक होऊ शकतं. परंतु माझी मुलगी अशी कोणतीही अ‍ॅक्टीविटी करत नाही.

टीआयच्या अशा धक्कादायक खुलाशानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशलवर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही अँगलनं ही गर्वाची बाब नाही असं अनेकांनी म्हटलं आहे. एकानं कमेंट केलीय की, पिता म्हणून सिंगरनं प्रत्येक वर्षी मुलीचा वाढदिवस साजरा करायला हवा. परंतु टीआय तिला हायमेन चेकिंगसाठी नेतात. एकानं म्हटलं की, सिंगर जे काही बोलत आहे त्यावरून असा मेसेज जात आहे की, मुलींचं शरीर हे त्यांचं नाहीये. स्वत:चाच त्यावर अधिकार नाही. एकानं असं बोललं आहे की,कोणतीही महिला कुणाचीही पर्सनल प्रॉपर्टी नाही. मग ती पत्नी असो वा मुलगी.