…… यासाठी मागितली 50 हजार मुस्लिमांनी दुवा !

नाशिक: पोलिसनामा ऑनलाईन

पेरणी झाल्यानंतर पावसाने अनेक दिवसापासून दडी मारलीय त्यामुळे पिके करपायला लागले असून बळीराजा हवालदिल झालाय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यात देखील अशीच स्थिती असून मागील दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यभर पाऊस पडावा यासाठी सुमारे 50 हजार मुस्लिम बांधवांनी आज (मंगळवार ) मालेगावातील ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करत दुवा मागितली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aca54d43-9a22-11e8-899c-bd7a047b06ac’]

मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे  तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड याठिकाणी पावसाने तोंड फिरवल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊन, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी, भरपूर पाऊस पडावा यासाठी मालेगावच्या ईदगाह मैदानावर सुमारे 50 हजार मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माइल यांच्या मार्गदर्शनाखाली ही नमाज अदा करण्यात येऊन, शेवटी अल्लाकडे दुवा मागत प्रार्थना करण्यात आली.