अबब ! चक्क 12 कोटींचा टीव्ही, ‘हे’ आहेत अनोखे ‘फीचर्स’

पोलीसनामा ऑनलाईन : टीव्ही बनविणाऱ्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा समावेश आहे. सॅमसंग टीव्हीचे पॅनल हे जगातील सर्वोत्तम पॅनल्स आहेत. तसेच किमतीच्या बाबतीही सॅमसंगचे टीव्ही परवडण्याजोगे असल्याने ग्राहकही या कंपनीस पसंती देतात. मात्र, त्याच वेळी सॅमसंगने बाजारात आणलेल्या या टीव्हींची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसणार आहे. कारण या टीव्हीची भारतातील किंमत थोडीथोडकी नसून तब्बल १२ कोटी रुपये असणार आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या भव्य आकाराच्या मायक्रो इलईडी स्मार्ट टीव्हीची औपचारिक घोषणा केली आहे. ‘द वॉल’ असे या टीव्हीचे नाव आहे. नावाप्रमाणेच खरोखर या टीव्हीचा आकार एखाद्या भिंतीऐवढा आहे. लासवेगस येथे ८ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या ‘द इंटरनॅशनल कस्टमर इलेट्रॉनिक शो २०१९’मध्ये कंपनीने ‘द वॉल’ची पहिली झलक दाखवली.

मायक्रो एलईडी डिस्प्ले असणारऱ्या या टीव्हीचे तीन वेगवेगळे प्रकार कंपनी बाजारात उतरवणार आहे. त्यातील पहिला १४६ इंचाचा टीव्ही गेल्या वर्षांपासून अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. १४६ इंचाच्या टीव्हीचे रेझोल्यूशन ‘४ के’ इतके आहे. यंदाच्या ‘सीईएस २०१९’मध्ये कंपनीने २१९ इंचाचा टीव्ही समोर आणला असून या टीव्हीचे रेझोल्यूशन ‘६ के’ इतके आहे. तर यातील सर्वात मोठा असणारा टीव्ही हा २९२ इंचाचा असणार आहे. या टीव्हीचे रेझोल्यूशन ‘८ के’ इतकं असणार आहे. सोबतच या टीव्हीमध्ये वेगवेगळे फिचर्सही असणार आहे.

‘द वॉल’ या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे आयट्यून्सवरील अ‍ॅपशी हा टिव्ही कनेक्ट करता येणार आहे. हा टीव्ही क्वॉटम प्रोसेसर फेक्स तंत्रज्ञानावर काम करतो. तसेच हा टीव्ही गुगल होम तसेच अमेझॉन ‘इको’सारख्या स्मार्ट स्पिकर्सच्या मदतीने वापरता येईल. ज्यामुळे रिमोट हातात न घेता टीव्ही चालू – बंद करणे, चॅनेल बदलणे, आवाज वाढवणे कमी करणे अशी सगळीच कामं केवळ आवाजाच्या मदतीने करता येणार आहे. टीव्हीमध्ये वापरण्यात येणारे मायक्रो इलईडी तंत्रज्ञान हे आर्टिफिशीयल इंटेलिजन्ससाठी वापरले जाते.

त्यामुळे अनोख्या फीचर्सने परिपूर्ण असणाऱ्या या टीव्हीची किंमत साडेतीन कोटी ते १२ कोटींदरम्यान आहे. एवढेच नव्हे तर ही केवळ मूळ किंमत असून त्यावर अतिरिक्त करही द्यावा लागणार आहे.

Visit : Policenama.com

You might also like