या शनिवारी पृथ्वीच्या जवळून जाणार ‘उल्का पिंड’, 5.2 किमी / सेकंदाच्या वेगाने येतोय जवळ, लांबी 570 मीटर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजकाल नासा अश्या उल्का पिंडीवर नजर ठेवत आहे, जो वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा आकार बराच मोठा आहे. असे सांगितले जाते की, त्याची लांबी एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा जास्त असू शकते. हे उल्का पिंड या आठवड्यात पृथ्वीच्या कक्षाजवळून जाईल. नासाने या उल्का पिंडचे नाव रॉक -163348 (2002 एनएन 4) असे ठेवले आहे. हे प्रति सेकंद सुमारे 5.2 किलोमीटर वेगाने येत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, 6 जून रोजी ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून जाईल.

त्याची लांबी 250 मीटर ते 570 मीटर (820 फूट आणि 1870 फूट) दरम्यान असू शकते. तर, एम्पायर स्टेट बिल्डिंगची लांबी (443 मीटर किंवा 1453 फूट) आणि लंडन आयची लांबी (135 मीटर किंवा 443 फूट) आहे. या प्रकरणात, या हा उल्का पिंड या दोन्ही इमारतींपेक्षा उंच आहे. नासाने या उल्कापाताचे वर्गीकरण अटेन अ‍ॅस्ट्रिड म्हणून केले आहे, जे सूर्याच्या जवळून जात पृथ्वीच्या कक्षेत दाखल होत आहे. माात्र याबद्दल घाबरून जाण्यासारखे काही नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ते म्हणतात की, हे पृथ्वीशी टक्कर घेणे शक्य नाही. दरम्यान, वैज्ञानिक यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. बर्‍याच वेळा गुरुत्वाकर्षणामुळे, उल्का पिंड शेवटच्या क्षणी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात.

नासाने म्हटले आहे की, रॉक -163348 (2002 एनएन 4) उल्का पिंड रविवारी सकाळी 8:20 वाजता पृृथ्वीच्या जवळूून जाईल. या उल्कापिंडांची गती प्रति सेकंद 5.2 किलोमीटर आहे. म्हणजेच ते 11,200 मैल वेगाने येत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आता 2024 मध्ये इतका मोठा उल्का पिंड पृथ्वीच्या कक्षेतून जाईल.

दरम्यान,21 मे 2020 रोजी 1.5 किमी लांबीचा एक उल्का पिंड पृथ्वीच्या कक्षेतच्या अगदी जवळ आला होता.