लांबच्या प्रवासासाठी कारमध्ये लावले जाते ‘हे’ खास फीचर, ड्रायव्हिंगच्या दरम्यान जाणवत नाही थकवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गाड्यांमध्ये क्रूझ कंट्रोल नावाच्या फीचरबाबत तुम्ही नेहमी ऐकले असेल, पूर्वी हे फीचर केवळ महागड्या लग्झरी कारमध्ये दिले जात होते. परंतु, आता बहुतांश कारमध्ये हे फीचर दिले जाते. नेहमी हायवेवर या फीचरचा वापर केला जातो. क्रूझ कंट्रोल काय असते आणि त्याचे फायदे कोणते आहेत ? ते जाणून घेवूयात.

जेव्हा हे फीचर ऑन केले जाते, तेव्हा एक्सीलेटर पॅडलवर पाय ठेवण्याची गरज भासत नाही. हे फीचर ऑन करताना गाडीचे स्पीड सेट करावे लागते, यानंतर तुम्ही तुमचा पाय एक्सीलेटर पॅडलवरून दूर करू शकता, आणि क्रूझ कंट्रोल फीचरच्या मदतीने गाडी सेट केलेल्या स्पीडवर स्वता धावू लागते.

50 कि.मी. प्रतितास वर होतो योग्य वापर
क्रूझ कंट्रोलचा योग्य वापर 50 कि.मी. प्रतितास स्पीडवर होतो, आणि याची मजा तेव्हा वाढते जेव्हा गाडीला मोकळा रस्ता मिळतो आणि दूर-दूरपर्यंत ट्रॅफिक नसेल. लक्षात ठेवा सिटी ड्राइव्हमध्ये क्रूज कंट्रोलचा वापर करू नये.

थकवा जाणवत नाही
क्रूझ कंट्रोलच्या वापराने ड्रायव्हरचा थकवा कमी होतो, कार वारंवार रेस करावी लागत नाही. परंतु, क्रूझ कंट्रोलचा वापर करताना रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. परदेशांमध्ये लोक सीटी ड्राइव्हमध्ये सुद्धा याचा वापर करतात, तेथे रस्ते सुद्धा चांगले असतात आणि लोक वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. मात्र, भारतात अनेकदा यापैकी काहीच नसते.

या फीचरमुळे आरामदायक होते ड्रायव्हिंग
ऑटो एक्सपर्टनुसार, सध्या लोक टॉप मॉडल गाड्या खरेदी करतात. थोडे जास्त पैसे देऊन अ‍ॅडव्हान्स मॉडल निवडतात. क्रूझ कंट्रोल फीचर ड्रायव्हिंगसाठी खुप आरामदायक आहे. परंतु, याच्या वापरासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. हे लांबच्या प्रवासात थकवा कमी करते. पण सुरक्षेसाठी तुम्हाला अलर्टही राहावे लागते.