‘या’ खास iPhone 11 ची किंमत लाखांमध्ये, सोन्यानं आणि हिरानं जडलेली पाठीमागील बाजू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाचा लक्झरी ब्रँड कॅव्हियरने ऍपलच्या आयफोन 11 चे खास व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन फोनचे नाव विक्ट्री ठेवण्यात आले असून याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. फोनच्या मागे V असे अक्षर असून विशेष म्हणजे या मोबाईलच्या मागे सोने आणि हिरे लावण्यात आले आहे.

या विक्ट्री फोनचे चार एडिशन असून यामधील टायटॅनियम हा बेसिक मॉडेल असून त्याची किंमत 4290 डॉलर म्हणजेच 3.4 लाख रुपये आहे. यामध्ये 64 जीबी इटंरनल स्टोरेज असून तुम्हाला अधिक स्टोरेज हवे असल्यास अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

20 लाखांपेक्षा अधिक किंमत
या बेसिक मॉडेलव्यतिरिक्त ब्लॅक एलीगेटर लेदर आणि बॅक साईडला हिरे असणारे मॉडेल देखील उपलब्ध आहे. हिरे लागलेल्या फोनची किंमत 30,820 डॉलर म्हणजेच 21.88 लाख रुपये आहे. तर ब्लॅक एलिगेटर फिनिश असलेल्या फोनची किंमत 12,000 डॉलर म्हणजेच 8.5 लाख रुपये आहे. लिमिटेड एडिशन असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे.

दरम्यान, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max यामधील डिझाईन देखील उपलब्ध असून कॅमेऱ्याच्या मागे असणाऱ्या पॅनलवर तुम्हाला ग्लास पाहायला मिळणार नाही.

visit : policenama.com