अर्थमंत्रीपदासाठी ‘या’ २ बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. ३०३ जागांवर भाजपने कमळ फुलवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदीच विराजमान होतील यात शंका नाही. मात्र देशातील अत्यंत महत्त्वाच्या मंत्रीपदांवर कोण असणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अर्थमंत्रिपद अरुण जेटली यांनी यशस्वीपणे सांभाळले. मात्र आता त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ते पुन्हा एकदा अर्थमंत्री होण्याती शक्यता कमी झाली आहे. तशी चर्चाही दिल्लीत सुरु आहे. त्यामुळे अर्थमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

अरूण जेटलींच्या जागेवर मोदींचे जवळचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाची वर्णी अर्थमंत्रीपदासाठी लागू शकते, अशी चर्चा सुरु आहे. एका वृत्तसंस्थेने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं घेत ही शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, आपल्या कार्यकाळात अरूण जेटलींची प्रकृती स्थीर नव्हती. सतत उपचारासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ रजेवर गेले होते. तेव्हा प्रकृतीमुळे त्यांच्या जागेवर ही जबाबदारी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जामंत्री पियुश गोयल यांनी सांभाळली होती. त्यामुळे अमित शहानंतर अर्थमंत्रीपदासाठी पियुष गोयल यांच्या नाव घेतले जाते. त्यामुळे भारताचे पुढील अर्थमंत्री हे अमित शहा किंवा पियुष गोयल हे असतील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like