मास्क घातल्याने होऊ शकतात अशाप्रकारचे स्किन प्रॉब्लेम, जाणून घ्या स्किन केयर टिप्स

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनासारख्या महामारीने लोकांना अनेक प्रकारे त्रस्त केले आहे. जेव्हापासून हा व्हायरस आला आहे लोकांना मास्क वापरणे आवश्यक झाले आहे. यापासून बचावासाठी मास्क घालण्यातच सुरक्षा आहे. परंतु, मास्क सतत घातल्याने लोकांमध्ये अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लेम सुद्धा होत आहेत, जसे की, मुरूमांची समस्या ज्यांना होती त्यांची आणखी वाढली. ज्यांना नव्हती, त्यांना सुद्धा ही समस्या झाली. याशिवाय डर्मोटोलॉजिस्टचे सुद्धा म्हणणे आहे की, मास्क घातल्याने विविध प्रकारच्या त्वचेच्या समस्या होऊ शकतात, जसे की चेहर्‍याची जळजळ.

मास्क घातल्याने होणार्‍या समस्या

1 मुरूमे : मुरूमे तेव्हा होतात जेव्हा तुमच्या त्वचेची छिद्र तेल, मृत त्वचा पेशी आणि घाणीने भरली जातात. हे पिंपल्स, व्हाइटहेड्स किंवा ब्लॅकहेड्सचे कारण ठरतात.

2 रोजेशिया : मास्कच्या वापराने ही समस्या आणखी वाढते. यामुळे पिंपल्स आणि त्वचा लाल होऊ शकते.

3 फॉलिकुलाइटिस : खाज आणि वेदना होऊ शकते. फॉलिकुलिटिसमध्ये केसांच्या छिद्रांमध्ये संसर्ग होतो.

मास्कने इंफेक्शनची कारणे?
मास्क घातल्याने तो त्वचेतील ओलावा, घाम, तेल आणि घाण शोषूण घेतो. ज्यामुळे मुरमे आणि पोर्स बंद होण्याची समस्या होऊ लागते. त्वचा अगोदरच ऑयली आहे, इंफेक्शन आणि डेड स्किन असेल तर समस्या आणखी वाढते. मास्कच्या आत श्वास घेणे आणि घामामुळे ओलाव्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका आणखी वाढतो. त्वचेला रेशॅस, जळजळ होऊ शकते.

अशी घ्या काळजी
* दिवसभरात चेहरा दोन ते तीनवेळा धुवा.
* त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाबजल वापरा.
* रात्री झोपण्यापूर्वी त्वचा क्लीन करा. फेस वॉशनंतर क्लीनजिंग आणि मॉयश्चरायजिंग करा. स्किन रिपेयरसाठी एखादी क्रिम असेल तर वापरा.
* माइल्ड क्लींजरचा वापर करा.
* मेकअपला ब्रेक द्या.
* प्रत्येक वापरानंतर फॅब्रिक मास्क धुवा.
* प्रत्येक 4 तासांनी मास्क काढा.
* मास्क घालण्यापूर्वी मॉयस्चरायजर लावा.
* योग्य मास्क निवडा. सिंथेटिक, नायलॉन किंवा रेयान मास्क टाळा.
* सतत चेहर्‍याला हात लावू नका.
* स्किनकेयर रूटीन सोडू नका.

स्किन अ‍ॅलर्जीसाठी बेस्ट ऑइल
1 पेपरमिंट ऑइल
2 कॅमोमाइल ऑइल
3 लव्हेंडर ऑइल स्किन मॉयस्चरायजिंगसाठी