‘हा’ खासदार करणार क्रिकेट वर्ल्ड कपची कॉमेंट्री !

दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमधून राजकारणात प्रवेश करणाऱ्या दिल्लीतील भाजपचा खासदार गौतम गंभीर आता क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मुंबईला कॉमेंट्री करण्यासाठी आला आहे. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये एक खासदार क्रिकेट वर्ल्ड कपची कॉमेंट्री करताना पहायला मिळणार आहे.

असे असताना गौतम गंभीरने सांगितले आहे की, मी मुंबई ला गेलो तरी येथील कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्याने असे देखील सांगितले आहे की आम्ही पुन्हा एकदा दिल्लीला शानदार बनवू. गंभीर क्रिकेट कॉमेट्री करणार असल्याने आता भारतीयांनी एका खासदाराकडून कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे.

नक्की काय म्हणाला गंभीर –
गंभीर म्हणाला की, माझा स्ट्रार स्पोर्टस चॅनल बरोबर पहिल्यापासूनच कार्यक्रम ठरलेला होता. त्यामुळे काही दिवसासाठी मला दिल्ली पासून लांब रहावे लागेल. परंतू त्यामुळे दिल्लीच्या विकासात कोणतीही बाधा येणार नाही.


वर्ल्ड कपच्या कॉमेंट्रीसाठी काही दिवस गंभीर मुंबईत व्यस्त असणार आहे. त्यावर गंभीरने ट्विट करत सांगितले आहे की, त्याचे लोकसभा कार्यालय श्रेष्ठ विहारामध्ये काम करत राहिल. माझ्या कार्यलयातून मला प्रत्येक घटनेबाबतची माहिती मिळत राहिल.


आता तर गंभीरने पुर्व दिल्ली स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न देखील सुरु केले आहेत. त्यासाठी नगरपालिका आयुक्तांसोबत त्यांने चर्चा देखील केली आहे. तर आयुक्तांनी विकासाच्या कामात पुर्णता मदत करण्याचे आश्वासन गंभीरला दिले आहे.

लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता गंभीर दिल्लीतील त्याच्या मतदारसंघात जोमाने कामाला लागला आहे. परंतू त्याला मुंबईला वर्ल्ड कपच्या कॉमेंट्रीसाठी जावे लागणार आहे. असे असले तरी त्यांनी अधिकाऱ्यांना घडलेले प्रत्येक घटना त्याच्यापर्यंत पोहचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

You might also like