‘त्या’ चौघांची माहिती देणार्‍यांना 50 हजारांच बक्षीस

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांच्या हत्येप्रकरणी चार संशयितांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) शुक्रवारी फोटो आणि व्हिडीओ जारी केले असून त्यांची माहिती पोलिसांना देणार्‍यांना मराठा युवा क्रांतीकडून 50 हजार रूपयाचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस अधिक्षक प्रसाद अक्‍कानवरू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवुन त्या चार संशयितांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांना दिली होती. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन देखील सीआयडीकडून करण्यात आले आहे. मराठा युवा क्रांतीकडून संशयितांची माहिती देणार्‍यास इनाम जाहीर करण्यात आले आहे. आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर आवश्यक द्या. अत्यंत निर्घृणपणे एका निरागस, निष्पाप व्यक्‍तीची यांनी हत्या केली आहे असे लिहून मराठा युवा क्रांतीकडून रोख 50 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच म्हणजेच दि. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे दंगल उफाळून आली होती. त्यामध्ये राहुन फटांगडे यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या मृत्युप्रकरणी आत्‍तापर्यंत सीआयडीने तिघांना अटक केलेली आहे तर सीआयडी इतर चार संशयितांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे अहमदनगर जिल्हयातील आहेत तर एकजण औरंगाबादचा आहे. राहूल फटांगडे यांच्या मृत्युनंतर अनेक संघटनांकडून त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. राज्य शासनाने देखील दहा लाख रूपयांची मदत केली आहे.