चोरी केल्यानंतर दागिने गिळणार्‍या ‘या’ महिलेच्या पोटात निघालं दीड किलो सोनं अन् ९० नाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये नुकताच हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. कारणही तसेच आहे डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो सोनं आणि ९० शिक्के बाहेर काढले आहेत. पश्चिम बंगालच्या बिरभूमीच्या सरकारी रुग्णालयात या महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी हे सोनं त्या महिलेच्या पोटातून काढण्यात आलं.

या पार्श्वभूमीवर ही महिला घरातील दागिने चोरी करून हे दागिने खात असे. डॉक्टरांनी जेव्हा या महिलेवर शस्त्रक्रिया केली आणि तिच्या पोटातील एवढे दागिने पहिले तेव्हा डॉक्टरही हैराण झाले होते. एखाद्या महिलेच्या पोटात दीड किलो सोने निघणे ही खूप आश्चर्याची आणि धक्कादायक घटना आहे. तसेच कोणी आपल्या जीवाशी असाही खेळ करू शकतं हे आपण पहिल्यांदाच ऐकलं असेल.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बिरभूमीच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका २६ वर्षीय महिला पोटदुखीची समस्या घेऊन आली होती. त्यामुळे तिला डॉक्टरांनी अ‍ॅडमिट करून घेतले होते. यावेळी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्वास यांनी सांगितलं की, या महिलेची शस्त्रक्रिया केली आहे. त्यावेळी या महिलेच्या पोटात तब्बल ५ आणि १० रुपयांचे शिक्के निघाले. यात जास्त दागिने तांब्याचे आणि पितळाचे होते तर काही सोन्याचेही होते.

दरम्यान या महिलेच्या पोटात निघालेल्या या दागिन्यांना पाहून डॉक्टरही हैराण झाले होते. यावेळी या महिलेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्यांच्या घरातील सोनं आणि पैसे गायब होत होते आणि याबाबत जेव्हा त्या त्यांच्या मुलीला विचारत तेव्हा ती लगेच रडायला लागत होती. तेव्हापासून त्या महिलेने आपल्या मुलीवर नजर ठेवायला सुरु केले. परंतु, ती कधी खात होती. हे ते महिलेला समजलेच नाही.

या महिलेने आपल्या मुलीची अनेक रुग्णालयात तपासणी केली. पण तिच्या आरोग्यावर त्याचा काहीच परिणाम होत नसे. तसेच मागच्या काही दिवसापासून या मुलीला उलट्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे या महिलेने तिला रुग्णालयात भरती केले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.

आरोग्यविषयक वृत्त

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like