दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केवळ 5 महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केवळ पाचच महिल्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. शासनाच्या सूचनांनुसार सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी टाळून पूजाआर्चा देखील पार पाडल्या जात आहेत. त्यानुसार, दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पहाटेच्या सुमारास हजारो महिलांच्या उपस्थितीत होवुन सामूहिक अथर्वशीर्ष पठण करायच्या पण यंदा केवळ पाच महिलांच्या उपस्थितीत ‘बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात तो सोहळा पार पडला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्यावतीने रविवारी पहाटे 128 व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या पाच महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात सहभाग नोंदवला. या महिला गेल्या 10 वर्षांपासून या उपक्रमात सहभाग होत आहेत. यंदा या उपक्रमाचे 34 वे वर्ष आहे. अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शंख वादनाने झाली. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच यावेळी गणरायाची आरती देखील करण्यात आली. गणपतीच्या आगमनाच्या दुसर्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपासमोर होणार्‍या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाची शहरातील महिला वर्ग वाट पाहत असतात. मात्र, यंदा करोनामुळे हा उत्सव नेहमीप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात करता न आल्याने सर्वांची निराशा झाली.