यंदाचा गणेशोत्सव थर्माकोल विना, बंदी कायम : हायकोर्टाचा निर्णय

मुंबई:पोलिसनामा ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्लास्टिक वर बंदी घातली. याबरोबरच  थर्माकोल देखील पर्यावरणाला हानी पोहचवणारे आहे. थर्माकोलचे विघटन नैसर्गिक रित्या होत नाही. पर्यावरणाला हानिकारक गोष्टीना परवानगी देणे शक्य नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम ठेवली आहे.यासंदर्भात हायकोर्टाने सविस्तर आदेश याआधी दिले असून,विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळा दिलेला आहे. असे देखील न्यायालयाने म्हंटले आहे. तसंच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनची विनंतीही फेटाळून लावली.
[amazon_link asins=’B074ZMCM35′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’006d68d4-8686-11e8-9c09-318d51a23683′]

फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशन ची याचिका फेटाळली

गणेशोत्सवात मकर सजावट ही सहसा थर्माकोलचीच व्हायची. यासाठी थर्माकोल ची घाऊक खरेदी खूप आधी केली जाते राज्य सरकारने मार्च महिन्यात बंदी लागू केली. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशा विनंतीची याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनने अॅड. मिलिंद परब यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली होती.

गणेशोत्सवातील मखरांसाठी अनेक महिने आधीच विक्रेत्यांकडे ऑर्डर येतात आणि त्याप्रमाणे मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेत्यांकडून खूप पूर्वीच थर्माकोलची खरेदी होते. यानुसार, कलाकारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक याआधीच केली आहे. पण बंदीमुळे त्याचे मोठे नुकसान होईल. गणेशोत्सव संपण्याच्या दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत मिळाल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल, असा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते. मात्र, याविषयी न्यायमुर्ती अभय ओक व न्यायमुर्ती  रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली.