यंदा ‘उद्धवश्री पुरस्कारा’चे अठरा मानकरी  

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा ‘उद्धवश्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार  झी २४ तासचे प्रतिनिधी कैलास पुरी आणि बबनराव कांबळे यांना जाहिर झाला आहे. येत्या बुधवारी (दि. २९) रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04c0dab3-aa0b-11e8-b8ce-9722ee9901ef’]

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुपारी तीन वाजता हा सोहळा रंगणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या राज्यातील मान्यवरांचा यानिमित्ताने गौरव केला जाणार आहे.
वाचा आजच्या टॉप बातम्या 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ हे गेली पंधरा वर्षे याचे आयोजन करत होते. यंदा सन्मानिय सत्कार मुर्तींमध्ये बाळासाहेब लांडगे (क्रिडा), गोपाळ देवांग (क्रिडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब कऱ्हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रिडा), कैलास पुरी (झी २४ तास वार्ताहार), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखपाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (संस्थापक, सरस्वती शिक्षण संस्था), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक), या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b43b99e-aa0b-11e8-a7c9-23d8bdf6881e’]

पत्रकार परिषदेला कामगार नेते व पुरस्कार समितीचे निमंत्रक इरफान सय्यद, अध्यक्ष माधव मुळे, सचिव गुलाब गरूड, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.
बेस्ट नागीण डान्स प्रकरणी माधवी जुवेकर सह 7 जण बडतर्फ