पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा आकर्षणाचा विषय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. गणेश मंडळासह घराघरात गणेश मुर्तींची प्रतिष्ठपणा केली जात आहे. अनेक मंडळांनी आपला देखावा पूर्ण केला आहे काही मंडळांचे देखाव्याचे काम अजूनही सुरुच आहे असे दिसत आहे. भाविकांमध्येही मंडळांच्या देखाव्याला घेऊन कमालीची उत्सुकता असते. यात पुण्यात अनेक मोठे गणपती येतात. यापैकी आज आपण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने कोणताही देखावा साकार केला आहे हे जाणून घेणार आहोत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने यावर्षी सुर्यमंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सुर्य मंदिराची प्रतिकृती प्राचीन वेद पुराणं आणि शास्त्रांवर आधारीत आहे. त्यामुळे यंदा आता भाविकांमध्ये सुर्यमंदिराचा देखावा हा आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे. यंदा या गणेश मंडळाने 127 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. दगडूशेठ हलवाई अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यंदाचा देखावा हा कोणार्कच्या सुर्यमंदिरावर आधारीत आहे.

पुणे पोलीसही या 11 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 7 हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहे. नुकतीच पुणे पोलिसांची सार्वजनिक गणेश मंडळांसोबत बैठक झाली आहे. शहरात एकूण 3245 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत.

शहरात कडक बंदोबस्त केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथक आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बॉम्बशोधक पथकाचेही नियोजन केलेले आहे. पोलीस सहआयुक्त राजेंद्र शिसवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.