Pune News : किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार जाहीर

पुणे- पाककला क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार जाहीर झाला आहे. कै.महादेव वामन जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. निनाद पुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांच्यातर्फे बुधवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला पर्यावरणतज्ज्ञ डॉ.विनीता आपटे आणि डॉ.न.म.जोशी उपस्थित राहणार आहेत. पाककलेसारख्या अनेक सेवा आजही समाजामध्ये दुर्लक्षित आणि उपेक्षित आहेत. पाककला तज्ञ हे ख-या अर्थाने पडद्यामागचे सूत्रधार आहेत. परंतु त्यांना सन्मानित करण्यात येत नाही या भावनेतूनच आचारी व केटरर्स यांचा सन्मान करण्यात येत आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.