यंदाचा राष्ट्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार ‘नवनाथ गोरे’ यांना 

कोल्‍हापूर : पोलीसनामा  ऑनलाईन

साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा यंदाचा युवा साहित्य पुरस्कार कांदबरीकार नवनाथ गोरे यांना  मिळाला आहे. गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गोरे हे मुळचे सांगली जिल्ह्यातील असून उमदी येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीतील उमदी येथे झाले असून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एमए मराठीची पदवी घेतली आहे.

यापूर्वी नवनाथ गोरे यांना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, लातूर, वर्धा येथील बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्‍कार असे एकूळ दहा पुरस्‍कार मिळाले आहेत. आता या राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खॊवला गेला आहे. या पुरस्कारामुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.