परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक येथील मोटार वाहन निरिक्षक असलेले गजेंद्र तानाजी पाटील यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परबसह Anil Parab काही परिवहन अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाची तक्रार नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलीय. या तक्रारीवरून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी १६ मे या दिवशी अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यावरून पंचवटी पोलीस ठाण्याचे पीआय यांनी तक्रारीचे स्वरुप राज्यस्तरीय आहे आणि त्यात परिवहन मंत्री व काही अधिकाऱ्यांविरुद्ध आरोप केलेले आहेत. यामुळे जतयनी पोलीस आयुक्तांना २४ मे रोजी याबाबत माहिती दिली. तसेच, या तक्रारीवरून पोलीस आयुक्त पांडेय यांनी २७ मे रोजी सखोल चौकशीचे आदेश काढले आहेत.

तसेच, चौकशीसाठी सहकार्य करीत नसले तरी तक्रारीतील मजकूर पाहता त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. म्हणून तक्रारीकडे दुर्लक्ष करणे न्यायोचित होणार नाही, असे तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले आहे. त्याचवेळी आयुक्तांनी पोलीस महासंचालकांच्या २०१४ च्या एका आदेशाचा आधार घेत हे स्पष्ट केले आहे, की गजेंद्र पाटील यांची तक्रार ही ३ महिन्यांपूर्वीच्या प्रकरणातील असल्याने गुन्हा दाखल न करता अगोदर चौकशी केली जाईल.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

तक्रारीमध्ये काय आरोप आहेत ?
उपपरिवहन अधिकारी (Deputy Transport Officer ) बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यातील बदल्या कशा मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत. तसेच परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab हे त्यांना संरक्षण देतात. तर खरमाटे यांनी कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती रक्कम बदल्या/पदोन्नतीसाठी घेतले आहे. उपसचिव प्रकाश साबळे यांच्यावरही आरोप आहेत. असे तक्रारीत नमूद आहे.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

अनिल परब काय म्हणाले ?
अनिल परब Anil Parab म्हणाले, तक्रार करायची आणि CBI चौकशीची मागणी करायची असे राजकीय फॅड सध्या निघाले आहे. खात्यातील आयुक्त, अधिकारी सर्वांवर आरोप करणारे पाटील हे निलंबित अधिकारी आहेत. त्यांची खात्यात जी भांडणं आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी माझा संदर्भ घेतला आहे. एका निनावी पत्राची चौकशी करा, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या आधीच ते कोर्टात गेले. या अधिकाऱ्याला मी बघितलेले नाही. त्याने केलेल्या आरोपांबाबत मला माहिती नाही. असे परब यांनी म्हटले आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी