नाणारला विरोध करणाऱ्यांचे नातेवाईकच जमीन व्यवहारांचे दलाल : भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला राजकीय विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे नातेवाईकच प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिकांच्या जमिनी बाहेरील धनिकांना मिळवून देण्याच्या व्यवहारात गुंतलेले होते, असा आरोप भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. जठार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. जठार यांनी हा आरोप करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना हा टोला लगावला आहे.

जठार म्हणाले, शिवसेना आणि नारायण राणे हे नाणार प्रकल्पाला विरोध करत आहेत. दोघेही भाजपचे सहकारी पक्ष या नात्याने सत्तेत भागीदार आहेत. त्यामुळे या दोघांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधणे सहज शक्य आहे. या प्रकल्पावरून उगाच स्थानिकांच्या मनात गैरसमज तयार करून कोकणातील वातावरण खराब करू नये. विजयदुर्ग येथे समुद्राची खोली १९ मीटरपेक्षा जास्त असल्याने तेथे मोठे बंदर व्हावे अशी मागणी आम्ही केंद्रीय बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. त्याच सुमारास अरब देशांतून कच्चे तेल आयात करणे सुलभ होईल अशा पश्चिम किनारपट्टीवरील ठिकाणाचा शोध सुरू होता. विजयदुर्गला मोठे बंदर होतच आहे तर त्याच्याच जवळपास जागा असल्यास चांगले होईल या विचारातून गुहागर आणि नाणार या दोन जागांची पाहणी झाली. पैकी नाणारवर शिक्कामोर्तब झाले, अशी माहितीही जठार यांनी दिली.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2997f7ba-acea-11e8-b0ff-2de4704c827b’]

कोकणात प्रकल्प येत असेल तर स्थानिकांना सुविधा मिळायला हव्यात या दृष्टिकोनातून आम्ही एक अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. त्यात जमिनीला प्रति हेक्टरी एक कोटी रुपये दर द्यावा, प्रकल्पासाठी जमीन देणाèया कोकणवासीयांना प्रकल्पाचे समभाग देऊन त्यांना प्रकल्पात भागीदार करून घ्यावे, नाणार परिसरात एक परिपूर्ण स्मार्ट सिटी उभी करावी, नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर दर्जेदार रुग्णालय राजापूरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली आहे, असे जठार म्हणाले.

सनातनवरील लक्ष हटविण्यासाठी विचारवंतांची धरपकड : राज ठाकरे