निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांना दिलासा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

शिक्षकांना सुटीच्या दिवशी किंवा इतर काम नसताना निवडणुकीशी संबंधित काम देण्यास हरकत नाही. असे मत नोंदवित उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. त्याचवेळी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देता येतील, असा निर्णय न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए़. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने दिला आहे.

[amazon_link asins=’B01INTZQNU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0e571402-8b12-11e8-a9b7-d5f8ec58e651′]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष संजय शेळके आणि इतर सहा जणांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेले बुथ लेव्हल आॅफिसरचे काम करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

जळगाव महापालिकेची निवडणुक १ आॅगस्ट २०१८ रोजी होणार आहे. या कामासाठी आयुक्तांनी अंमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि धामणगाव येथील कला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे सोपविली होती. या आदेशाच्या नाराजीने प्रताप महाविद्यालयातील डॉ. अमित बाबूराव पाटील व इतर ५७ कर्मचारी तसेच धामणगाव महाविद्यालयातील के.एम. पाटील व इतर २५ कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

[amazon_link asins=’B073GR3F2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20cd07a5-8b12-11e8-becf-6fc2ca7d86bb’]