Madhya Pradesh : दतिया आणि भिंडमध्ये कोरोना कर्फ्यूचे उल्लंघन करणार्‍यांना नागिन डान्स आणि बेडूक शर्यतीची शिक्षा, पहा VIDEO

दतिया/भिंड : मध्य प्रदेशच्या दतिया आणि भिंड जिल्ह्यांमध्ये कोरोना कर्फ्यूचे उल्लंघन करणार्‍यांना पोलिसांनी नागिन डान्स करण्याची आणि बेडूक शर्यतीची शिक्षा दिली. नंतर पोलिसांनी त्यांना समजावून सोडून दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. राजगढ पोलीस ठाणे प्रभावी वाय. एस. तोमर यांनी सांगितले की, वारंवार समजावूनही लोक घराच्या बाहेर विनाकारण पडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी आम्ही अनेक प्रकार अवलंबत आहोत. आम्ही लोकांना समजावत आहोत विनाकारण बाहेर पडू नका.

त्यांनी म्हटले, आम्ही घरातून विनाकारण बाहेर पडणार्‍या लोकांना शिक्षा म्हणून उठा-बशा काढणे, रामनाम लिहिणे, कोंबडा बनने, त्यांची आरती करणे, अस्थाई जेलमध्ये पाठवणे आणि नागिन डान्स करण्याची शिक्षा देत आहोत. उप पोलीस अधीक्षक (पोलीस मुख्यालय भिंड) मोती लाल कुशवाहा यांनी सांगितले की, भिंड जिल्हा मुख्यालयापासून 15 किलोमीटरच्या अंतरावरील ऊमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुल्तान सिंहच्या गावात शासकीय छात्रावास भवनमध्ये बुधवारी वर मुकेश जाटव (25)चे फलदान आणि लगुन कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते, ज्याची माहिती मिळताच पोलीस आयोजनस्थळी पोहचले असता तिथे सुमारे 200 लोक कार्यक्रमात जेवणाचा अस्वाद घेत होते.

भिंडमध्ये बेडूक शर्यत
त्यांनी म्हटले की, कोरोना कर्फ्यूचे उल्लंघन केल्याने वर मुकेश जाटव (सुल्तान सिंहमधील गाव) आणि मांडव डेकोरेटर्स राजेंद्र जाटवविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदिवासी कल्याण विभागाच्या अधीक्षकांची इमारत उपलब्ध करून दिल्याने चौकशी केली जात आहे. जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. कुशवाहा यांनी सांगितले की, या लगुन फलदान कार्यक्रमातून ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विना मास्क परतणार्‍या 30 ते 35 लोकांना रस्त्यात पोलिसांनी पकडून बेडूक उड्या मारण्याची शिक्षा देऊन सोडून दिले.