सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्यांनी नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी : सहायक आयुक्त अनुपमा पवार

पुणे : सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यालयात यापूर्वी सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेली आहे परंतू अद्याप आपल्या नोंदणीचे अपडेशन व आपल्या नोंदणी क्रमांकास आपला आधार क्रमांक जोडलेला नाही अशा सर्व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइट वर जावून Job Seeker option मध्ये आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून नोंदणी अद्यावत करावी. अन्यथा आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 अखेर रदद होईल.

अपडेशन अभावी आपली नोंदणी रद्द झाल्यास आपणास या विभागामार्फत मिळणा-या सुविधांचा भविष्यात लाभ घेता येणार नाही. तरी तात्काळ आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 पूर्वी अद्यावत करावी, असेही आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like