कोल्हापूर जि.प.मध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला तेच चौकशी करतायेत : चंद्रकांत पाटील

पोलिसनामा ऑनलाईन – कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारबाबत जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. पण ज्यांनी भ्रष्टाचार केला तेच चौकशी करत असल्याचे दिसत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे आमदार चंद्रकांत पाटील, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे , देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी विभागीय आयुक्त सौरव राव , जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात व जिल्ह्यात बर्‍याच रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णांना रुग्णालयाच्या दारोदारी फिरावे लागत आहे. ही बाब गंभीर असून उपाययोजनाबाबत स्पष्टता आणावी. खासगी रुग्णालय सरकार मान्य दरापेक्षाही अजून जास्त कर आकारत असूनही कारवाई केली जात नाही. खासगी प्रयोगशाळेमध्ये सरकारमान्य दरापेक्षा अधिक दराची आकारणी होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी पाटील यांनी केली.