जनतेने नाकारले तेच अफवा पसरवत आहेत : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना जनतेने नाकारलं आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले, निवडणुकीत जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली असल्याचेही मोदी म्हणाले.

जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे दिल्ली पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोरह जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह पक्षातील अनेक जेष्ठ आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करून विरोधकांवर निशाणा साधला.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –
लोकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक आज अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. ते खोटं बोलत राहतील आणि आम्ही पुढे जाऊ.
जनता ही आमची खरी शक्ती आहे. याच शक्तीनं पहिल्यांदाच एखाद्या बिगर काँग्रेस पक्षाला बहुमत दिलं आणि त्यानंतर मोठे बहुमत दिले. निवडणुकीत जनतेने नकारलं त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्र आहेत. त्यात खोटं बोलणं आणि अफवा पसवणं ही दोन शस्त्र आहेत.

हिमाचलच्या लोकांना वाटत असेल की हिमाचलचा सुपुत्र आज भाजपचा अध्यक्ष झाला. पण नड्डांवर जेवढा अधिकार हिमाचलचा आहे तेवढाच बिहारचा. त्यांचे शिक्षण बिहारमध्ये झाले आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेला जास्त अभिमान वाटला असले. माझ्या अयुष्यात सर्वात ऊर्जा देणारे दिवस हिमाचलप्रदेशमधील आहेत. मी जेव्हा हिमाचल प्रदेशात काम करत होतो त्यावेळी नड्डा युवा मोर्चाचे काम करत होते. मी खूप भाग्यवान आहे. या ठिकाणी बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम केलं त्यांचे बोट पकडून शिकायला मिळालं.

फेसबुक पेज लाईक करा –