सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत करणार मोठा बदल : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील वाढत्या प्रदूषणास खासगी वाहनांचा वापर कारणीभूत असून, नागरिकांनी खासगी वाहनाचा वापर कमी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरु आहे. त्यामध्ये अधिकतम CNG, इलेक्ट्रिक वाहने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सहभागी केल्याने प्रदूषण कमी करता येईल, ज्यामुळे इंधन बचत होईल, असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

गडकरी यांनी सांगितलं की, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चात बचत करता येईल. त्यांनी रिन्यूबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा वापरावर जोर दिला. अशा गाड्यांच्या वापरामुळे कच्च्या तेलाच्या आयातीतही घट होईल. नागपूरमध्ये ४५० बसेसना बायोफ्लूयमध्ये बदलण्यात आलं आहे. बसेसमध्ये इंधनाचा वापर केल्यामुळे वर्षाला तब्बल ६० कोटी रुपयांची गरज असते. पण अशा बसेस CNG बदलता येऊ शकते. सोबतच त्यांनी म्हटलं की, सिवेजच्या पाण्यातून सीएनजी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याकरता लंडन बस मॉडेलचा वापर करण्याची गरज असल्याचं, गडकरी म्हणाले. तसेच बस चालकांना डबल डेकर बस चालवण्याचा सल्ला दिला. बसेसमध्ये आधुनिक सुविधांचा अंतर्भाव केल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, अशा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.