फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे हजारो पिशव्या आणि हरिपाठाचे वाटप

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने निगडी आणि दिघी येथे वारकऱ्यांसाठी विविध सेवा पुरवण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिघी येथे फिनोलेक्स पाईप्स च्या वतीने हरिपाठाच्या पंधरा हजार पुस्तिका, बावीस हजार कापडी पिशव्या, सहा हजार टोप्या वाटण्यात आल्या. दिघीतील मुख्य चौकात ससून रुग्णालयाच्या सहकार्याने मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec693193-81e9-11e8-812f-378074be7e25′]

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर निगडी येथे पंधरा हजार हरिपाठ पुस्तिका, अठरा हजार कापडी पिशव्या, सहा हजार टोप्या वारकऱ्यांना वाटण्यात आल्या. फिनोलेक्सच्या विपण विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, विश्वजीत हरुगडे आणि पंधरा कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे नियोजन केले.