तब्बल 1000 हजार लोकांसमोर झाली होती अभिनेत्री माधुरीच्या ‘या’ गाण्याची शुटींग, गाणं सुरू असताना लोक उडवायचे ‘पैसे’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील अशी फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे जी आजही इंडस्ट्रीत सक्रिय आणि लाखोंच्या मनावर राज्य करत आहे. अलीकडेच तिनं ट्विट करत तिचं हिट साँग एक दोन तीन बद्दल अनेक मजेदार गोष्टी सांगितल्या आहेत. तिनं हाही खुलासा केला की, हे हिट साँग रिअल ऑडियंससमोर शुट करण्यात आलं आहे.

माधुरीनं खुलासा केला की, तेजाब या सिनेमातील एक दोन तीन हे गाणं 1000 लोकांच्या समोर शुट करण्यात आलं आहे. हे गाणं शुट करण्यासाठी 10 ते 15 दिवस आधी सराव केला होता. लोक हे गाणं पाहून एवढे पागल होत होते की, हे गाणं पाहून चक्क स्क्रीन्ससमोर पैसे उडवायचे” असंही माधुरीनं सांगितलं.

https://youtu.be/MS5BLS2sIDM

आपल्या ट्विटमध्ये माधुरीनं म्हणते, “चला #EkDonTeen सोबत #SunoSunaowithMD पार्टी सुरू करूयात. मी 10-10 दिवस आधी या गाण्याच्या सर्वाला सुरुवात केली होती. हे गाणं त्याकाळी खूप लोकप्रिय झालं होतं. तुमचे प्रश्न मला पाठवा आणि या गाण्याच्या आठवणी माझ्यासोबत शेअर करा.”

माधुरी सांगते की, या गाण्यानंतर लोक तिला म्हणून म्हणायला लागले होते. लोक यासाठी पागल झाले होते. 80 आणि 90 च्या दशकात माधुरीच्या या गाण्यानं खूप धुमाकूळ घातला.