शहरातील रस्त्यांवर हजारो खड्डे, नागरिकांच्या जीवाशी खेळ – साने

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरात फक्त दोन हजार खड्डे पडले पैकी २००, २५० खड्डे बुजवण्याचे राहिले असल्याचे खोटे सांगितले आहे. शहरात आणखी हजारो खड्डे पडले आहेत ते मी स्वतः दाखवू शकतो. फक्त सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवायला पाहिजेत असे विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले. सत्ताधारी पक्षाचा भष्ट्राचारयुक्त कारभारातून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून ते पिंपरी-चिंचवडकरांच्या जिविताशी खेळण्याचे काम करीत असल्याचा आरोपीही साने यांनी केला आहे. तसेच नागरिकांनी आपल्याला दिसत असलेल्या खड्यांचे फोटो काढून माझ्या व्हाट्सअपला पाठवावेत असेही आवाहन साने यांनी केले आहे.
[amazon_link asins=’8131901378′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a16beaf-872d-11e8-9aa0-4ddaf3d905d0′]
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. आमच्या काळात रस्त्याचा विकास आम्ही केला. बहुतांश रस्ते खड्डे मुक्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर झाले होते व त्याबाबत थेट शहरात व बाहेरच्या राज्याचे नागरिक या रस्त्यांची स्तुती करत असत. तसेच आमचे नेते अजित पवार पावसाळा सुरु होण्याअगोदर दोन महिने अगोदर योग्य नियोजन करुन पावसाळ्यात रस्ते खड्डे विहरीत राहतील याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन प्रशासनास आदेश देत असत. त्यामुळे आमच्या काळात रस्त्यांची अशी चाळण होत नसे.

नागरिकांचे हाल अथवा मनस्ताप सहन करावा लागत नव्हता. परंतु या शहराला दोन आमदार व सत्ताधारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून दोन संस्थानिक तयार झालेले असून त्यांची आर्थिक फायद्याचे ठेके (टक्केवारी) आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कुतरओढ सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला सत्ताधारी भाजपा व प्रशासनाला वेळच नाही. येत्या 15 दिवसात संपूर्ण शहर खड्डे मुक्त शहर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे.