पोलीस भरतीतील बदलांविरोधात हजारो तरुण-तरुणी रस्त्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या पोलीस भरतीमध्ये बदल करण्याच्या निर्णयाविरोधात भरतीची तयारी करणारे पुण्यातील हजारो तरुण तरूणी रस्त्यावर उतरले असून त्यांनी आज पुण्यात मोर्चा काढला आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणारे हे उमेदवार मुठा नदीपात्रात एकत्र जमीन थेट जिल्हाधिकारी कार्यालयवर आपला मोर्चा नेणार असून तेथे ११ फेब्रुवारीपर्यंत उपोषणाला बसणार आहेत.

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केल्याचे राज्य सरकारने जाहिर केले आहे. यापुर्वी पोलीस भरतीसाठी १०० गुणांची मैदानी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण होणार्‍यांची १०० गुणांची लेखी चाचणी घेतली जात होती. दोन्ही चाचण्यांमधील गुणानुक्रमे पोलीस भरती होत होती. परंतु आता राज्य सरकारने यात बदल करून मैदानी चाचणी ५० गुणांची करण्यात येणार आली आहे. तर लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेतली जाणार आहे.

पोलीस भरतीची तयारी करणारे पुण्यातील हजारो तरुण – तरुणी मुंबईपर्यंत धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व उमेदवार आज मुठा नदी पात्रात जमले. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन देऊन धरणे आंदोलन करणार आहेत.