Threat Letter To Rahul Gandhi | राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी ! मिठाईच्या दुकानात मिळालं लेटर; ‘तुम्हाला बॉम्बने…’

मध्यप्रदेश : सध्या राहुल गांधी (Threat Letter To Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेनिमित्त (Bharat Jodo Yatra) संपूर्ण देशभर फिरत आहेत. सध्या ते महाराष्ट्रात असून काही दिवसात भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) प्रवेश करणार आहे. असे असतानाच राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी  मिळाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore) एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना (Rahul Gandhi) धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. मध्यप्रदेश पोलीस (Madhya Pradesh Police) आणि क्राइम ब्रांच (Crime Branch) हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश पोलीस सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने धमकीचे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा केरळ (Keral) मधून सुरु झाली असून ती काश्मीर (Kashmir) पर्यंत
चालणार आहे. या यात्रेतून राहुल गांधी पुन्हा जनसंपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असून, २०२४
च्या निवडणुकीसाठी स्वतःचे पारडे जाड करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, हे पत्र हा खोडसाळ प्रकार
असल्याची शक्यता वर्तवली आहे. पण तरीही पोलीस सर्व काळजी घेत असून तपास सुरु आहे.

Web Title :- Threat Letter To Rahul Gandhi | threat letter to congress leader rahul gandhi in indore madhya pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Protest Against Rahul Gandhi | शिंदे गटाच्या आंदोलनातील ‘अपघात’ टळला, अन् ‘ती’ महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली, पण…

Ravi Rana | ‘उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – रवी राणा

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना