गर्लफ्रेन्डच्या ट्रान्सफरसाठी विमान अपहरणाची धमकी देणे पडले महागात, न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेट एअरवेजमध्ये नोकरी करत असलेल्या गर्लफ्रेन्डच्या ट्रान्सफरसाठी विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका बिजनेसमनला अहमदाबाद स्पेशल NIA न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर त्याला ५ कोटी रुपयांचा दंडही सुनावला आहे.

बिरजू सल्ला असे या बिजनेसमनचे नाव आहे. एंटी हायजॅकींग अक्टनुसार जन्मठेपेची शिक्षेसह ५ कोटींच्या दंडाची शिक्षा झालेला हा देशातील पहिला दोषी आहे.

काय घडलं होतं त्या दिवशी ?

बिरजू सल्ला हा २० ऑक्टोबर २०१७ रोजी जेट एअरवेजच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटने जात होता. त्यावेळी विमानाच्या टॉयलेटमध्ये असलेल्या टिश्यू पेपरवर इंग्रजी आणि उर्दूत प्लेन हायजॅक करण्याची धमकी दिली होती. त्यात त्याने पाक व्याप्त काश्मीरमध्ये नेण्याचा सल्ला त्याने त्यात दिला होता. त्याने धमकीच्या पत्रावर अल्लाह – हु – अकबर असेही लिहीले होते. तेव्हा विमानाचे अहमदाबाद एअरपोर्टवर विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी बिरजू सल्लाला अटक केली होती.

गर्लफ्रेन्डच्या ट्रान्सफरसाठी दिली धमकी

सल्लाने याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याची गर्लफ्रेंड जेट एअरवेजमध्ये दिल्लीत नोकरी करत होती. त्याच्या धमकीमुळे दिल्लीतील आपले ऑफिस जेट एअरवेज बंद करेल. त्याची गर्लफ्रेन्ड मुंबईत परत येईल असे त्याने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com)

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

 

 

You might also like