मुंबई लोकल मार्ग उडवण्याची धमकी

मुंबई :वृत्तसंस्था

महाराष्ट्राची शान असलेली मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते . आता एका दशतवादी संघटनेकडून मुंबईची रक्तवाहिनी म्हणजेच मुंबई लोकल उडवून देऊ असा संदेश आला आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की , दहशतवादी संघटनेकडून मुंबई लोकल मार्ग उडवून देण्याचा संदेश आल्यानंतर सुरक्षा यंत्रणेकडून पश्चिम रेल्वेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात कुख्यात दहशवादी संघटना अल कायदा द्वारे रेल्वे मार्ग उडवून देण्याबाबतचा संदेश बुधवारी फिरला. हा संदेश वरिष्ठ पातळीवर एका इमेल द्वारे आला होता. त्यानंतर मात्र तातडीने उपाययोजना हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात बुधवारी याबाबतचा ईमेल येताच, वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली. त्याकडे गांभीर्याने पाहत धोक्याचा संदेश कोणत्या संघटनांकडून आला का, याचाही तपास केला जात आहे.

You might also like