ठाणे : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन अटेंडेंटनं क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर 3 वेळा केला बलात्कार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका कोविड – 19 क्वारंटाईन सेंटरच्या सहाय्यकाला तेथील एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, ही घटना जूनची आहे परंतु शनिवारी या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.अधिकाऱ्याने सांगितले कि, महिलेने तक्रारीत म्हंटले, मीरा रोड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 11 वर्षाच्या नातेवाईकाच्या देखभालीसाठी गेली असता ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या आपल्या 11 वर्षाच्या नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी ही महिला तिच्या 10 महिन्यांच्या लहान मुलीसह क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत होती. आरोपी तिच्या खोलीत गरम पाणी देण्यासाठी जात असत आणि त्यावेळी त्याने महिलेसोबत कथितपणे गैरव्यवहार केला, ज्याचा महिलेने विरोध केला. आरोपीने तिच्या मुलीची हत्या करण्याची धमकी दिली.

या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने जूनच्या पहिल्या आठवड्यात महिलेच्या खोलीत तिच्यावर तीन वेळा बलात्कार केला. भीतीपोटी ही महिला त्यावेळी पोलिसांकडे गेली नव्हती, शनिवारी तिने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानंतर आरोपीला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली.