अमरावती : लवाद अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, दोघावर FIR दाखल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – लवाद अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल केला आहे. अमरावती येथील न्यायालयात 7 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार फिर्यादीने शनिवारी (दि. 10) गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

रवींद्र पांडुरंग जरुदे (42 रा. रविनगर, हनुमान मंदिराजवळ, अमरावती) आणि एक महिला असे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ विश्वनाथ रामटेके ( 42) यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्याद हे अमरावती न्यायालयात लवाद अधिकारी आहेत. आरोपीनी 7 एप्रिल रोजी सकाळी न्यायाधिकरणात आले आणि न्यायदानाच्या कक्षात जबरीने प्रवेश करून. माझ्या केसचे काय झाले, असे म्हणून अश्लील शिवीगाळ करुन न्यायधीकरणास अपमानीत केले. तसेच लवादाचे न्यायीक कार्यवाहीत अडथळा निर्माण केला. कोरोनामुळे न्यायधीकरणाचे काम बंद असून अती महत्वाच्या प्रकरणाची लवाद कार्यवाही सुरु असल्याचे आरोपीला सांगतिल होते. त्यावेळी आरोपीनी न्यायाधीकरणाचे बाहेर पडत घाणेरड्या शिव्या देऊन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जर आमच्याविरुद्ध निकाल दिला तर पाहुन घेऊ. असे ते म्हणाले. फिर्यादीने शनिवारी प्रकरणाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रवींद्र जरुदे यास अटक केली आहे.