भाजपच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारमध्ये तलवार सापडल्याप्रकरणी माजी आमदाराच्या नातवासह तिघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फॉर्चूनर कारमध्ये पोलिसांना एक तलवार सापडली.

अमर उमेश पाटील (वय. २३, रा. सोलापूर), अजित मल्लिनाथ किवडे (वय २४, उत्तर कसबा, सोलापूर), आदित्य धन्यकुमार शहा (वय २५, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. त्यावेळी पोलिसांना पोतदार महाविद्य़ालयासमोर एक फॉर्चूनर गाडी संशयास्पदरित्या मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली तेव्हा गाडीत तलावर मिळून आली. पोलिसांनी गाडीतील तिघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी ही तलावर जप्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अमर पाटील हा अक्कलकोट येथील भाजपच्या माजी आमदाराचा नातू आहे.