बीडीओकडे (BDO) खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – औसा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना वर्गणीच्या नावाखाली खंडणीची मागणी व फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी  दिली.

गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे दालनात सकाळी विस्तार अधिकारी धावरे, मादळे, तेलंग, टोम्पे, राऊत व बालाजी गायकवाड या कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मिशनचा आढावा घेत होते. त्यावेळी आकाश पाटील यांच्यासह ७ ते ८ जण त्यांच्या दालनात आले व त्यांनीवर्गणी मागत गोंधळ घातला.

मी वर्गणी किंवा देणगी देवू शकत नाही म्हटल्यावर संशयित आरोपी आकाश पाटील यांनी चला रे बघून घेवूत असे धमकावत दालनाबाहेर निघून गेले. त्यावर चिडून जाऊन संशयित आरोपी आकाश पाटील यांनी बेकायदेशीर पैशाची मागणी करत अपमानकारक व धमकीवजा मजकूर सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकवर टाकली व माझी बदनामी केली असल्याची तक्रारी केली आहे. यावरून उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी आकाश पाटील व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us