प्रवाशांना लुटणारे 3 आरोपी पुणे पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पहाटे खासगी ट्रॅव्हल्समधून उतरून पायी जाणाऱ्या प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांनी पोलिसांनी काही तासाच अटक केली. ही घटना मंगळवारी (दि.27) पहाटे साडे चारच्या सुमारास पुण्यातील संगमपुलावर घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या काही वेळात मुसक्या आवळल्या आहेत.

पहाटे खासगी ट्रॅव्हल्समधून उतरून पायी जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. यातच मंगळवारी पहाटे एका प्रवाशाला संगम पुल परिसरात लुटल्याची घटना घडली. या परिसरातील ही सलग दुसऱ्या दिवशी घडलेली जबरी चोरीची घटना असून येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिन्याभरातील पाचवी घटना आहे.

वाघोली येथील एक व्यक्ती नांदेड येथून खासगी ट्रॅव्हल्सने मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास संगमवाडी येथील खासगी ट्रॅव्हल्स स्थानकामध्ये उतरले. तेथून ते पायी पुणे स्टेशनच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडी 10 हजार रुपयांची रक्कम, मोबाईल आणि अन्य वस्तू जबरदस्तीने चोरून नेले. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले. अटक करण्यात आलेले आरोपी स्वारगेट आणि वाघोली परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like