देशाने पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक केले , तिसऱ्याची माहिती देणार नाही : राजनाथसिंह 

मंगळुरू : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताने आतापर्यंत तीन एअर स्ट्राईक केले आहेत. मात्र मी तुम्हाला केवळ दोन स्ट्राईक बद्दल सांगणार आहे. तिसऱ्या स्ट्राईक बद्दल सांगणार नाही. असे केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंह यांनी म्हंटले आहे.

आताचा भारत दुबळा राहिला नाही , सशक्त भारत आहे . भारताने गेल्या ५ वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला . मी तुम्हाला केवळ दोन स्ट्राईक बद्दल सांगणार आहे . मात्र तिसऱ्या स्ट्राईक बद्दल सांगणार नाही. विशेष म्हणजे राजनाथसिंह यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा हल्ला आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा एअर स्ट्राईक याबाबत सांगितले . त्यामुळे तिसरा स्ट्राईक नेमका कोणता असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

१४ फेब्रुवारीला काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या दशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शाहिद झाले होते. त्यानंतर भारतीय वायू दलाने एअर स्ट्राईक द्वारे त्या दहशतवादी हल्ल्याचे प्रतिउत्तर दिले होते. दरम्यान ३५० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त होते. अश्याच प्रमाणे भारताने तीन एअर स्ट्राईक केले असल्याचे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे.