भय्यू महाराज मृत्यू प्रकरण : अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणीसह दोघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विनायक दुधाले, शरद देशमुख आणि एका तरुणीला अटक केली आहे. या सर्वांवर भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डाॅ. आयुषी शर्मा व पहिल्या पत्निची कन्या कुहू यांनी पोलीस उपमहानिरीक्षक हरीनारायणचारी यांची भेट घेत दोन सेवक आणि एका तरुणीने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. यावरुन भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. भय्यू महारांजांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली होती. त्यामध्ये लिहिले होते की, ‘माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा’. भय्यू महाराजांचे कुटूंब एवढे मोठे असताना त्यांनी नोकराने कारभार पाहावा असे का लिहिले असावे असा अनेकांना प्रश्न पडला होता.

पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रायव्हर कैलास पाटील याला या कटकारस्थानाची माहिती होती. त्याने या अटक करण्यात आलेल्या विनायक दुधाले, शरद देशमुख व एक तरुणी यांनीच षडयंत्र रचल्याबाबतचा जबाब नोदवला होता. त्यानुसार भय्यू महाराजांच्या कुटूंबीयांनी त्या तिघांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावरुन त्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

ड्रायव्हर कैलासचा जबाब-

भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गलं, फूटी कोठी भागात राहणारी तरुणी याची सुत्रधार आहे. ही तरुणी भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे, तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले व अश्लील व्हिडिओ तयार केले. डाॅ. आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचे घरी येणं – जाणं बंद झालं. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केला जात असे. असा जबाब कैलासने दिला असल्याचे पोलीसांनी रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

विनायक कोण आहे ?

विनायक दुधाले हा मुळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्यातील आहे.
विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबत असे,
विनायक भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी असे,
विनायकचा शब्द भय्यू महाराजांचा शब्द मानला जात असे