Pune News : ‘त्यानं’ लग्नास नकार दिला, ‘त्यांनी’ थेट गुप्तांगावर केले सपासप वार, प्रचंड खळबळ

वालचंदनगर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने गुप्तांगावर वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे घडली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. नामदेव बाजी सकट (वय-45) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नामदेव सकट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश नामदेव मोहिते (वय-50) अनिल शिवाजी गुळीक (वय-28), भाऊ उर्फ भावड्या नामदेव मदने (वय-33 सर्व रा. शेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोरी या गावचे रहिवासी असून ते शेळगावमध्ये पाहुण्याकडे नेहमी ये-जा करीत असतात. ते मजुरी करुन स्वत:ची उपजीविका करतात. बुधवारी (दि.13) कामा करुन ते शेळगाव येथील शिवा मदने या मित्राच्या घरी मुक्कामी गेले होते.

गुरुवारी (दिय14) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश मोहिते, अनिल गुळीक, भावड्या मदने हे शिवा मदनेच्या घरी आले. त्यांनी सकट यांना प्रकाश मदने यांची नांदत नसलेल्या मुलीसोबत लग्न करण्याचा हट्ट करत शिवीगाळ केली. नामदेव सकट यांनी लग्नास नकार दिल्याचा राग आरोपींना आल्याने त्यांनी धारदार शस्त्राने सकट यांच्या गुप्तांग, पोटावर वार केले. सकट यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत.