Chakan News : गुटखाजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुटखाजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख 82 हजार 80 रुपयांचा गुटखाजन्य पदार्थ व एक टेम्पो असा एकूण 10 लाख 82 हजार 080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण शिक्रापूर रोडवर करण्यात आली आहे.

अशोक बबन काकडे (वय-55 रा. आळेफाटा, जुन्नर), राहुल संजय डोंगरे (वय-28) आणि हर्षद सुरेश गंगावणे (वय-21 रा. बहुळ, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रेमकुमार बबन पावडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शिक्रापूर रोडवर एका टेम्पोमधून (एमएच 14 एचजी 4905) प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक करताना तिघेजण आढळून आले. पोलिसांनी टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये गुटखाजन्य पदार्थ आढळून आला. पोलिसांनी आरोपींना अटक करुन 10 लाख 82 हजार 080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.