बीड : दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा टाकण्याच्या तयारी दबा धरून बसलेल्या टोळीतील तीन जणांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही कारवाई रविवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास बीड शहरातील व्यंकटेश पब्लीक स्कूलच्या समोरील पटांगणात करण्यात आली. त्यांच्याकडून दरोड्यात वारण्यात येणारे ८५ हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अमोल संजय बारसकर (वय-१८ रा. भक्ती कंस्ट्रक्शन, बीड), प्रविण प्रकाश कोकाटे (वय-२० रा. माळे गल्ली, बीड), राहुल विष्णूपंत वलेकर (वय-२३ रा. शाहूनगर, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तरसनी श्याम आठवले (रा. माळीवेस, बीड), शेख राजु उर्फ काल्ला शेख अजीज (रा. बांगर नाला, गोरे वस्ती, बीड) अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक फेरोज खान अब्दुलरौफ पठाण (वय-४२) यांनी फिर्याद दिली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शेख सलीम, राऊत आणि उजागरे रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी व्यंकटेश पब्लीक स्कूलच्या समोरील पटांगणात दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी अंधारात दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. पोलिसांना पाहताच दुचाकीवरून पळून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. तर अंधाराचा फायदा घेत दोनजण दुचाकीवरून पळून गेले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात