बोगस माथाडी संघटनेच्या नावावर खंडणी मागणारे अटकेत

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – बोगस माथाडी कामगार संघटनेचे पावती पुस्तक छापून साडे तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. राहुल हरीभाऊ येवले, अशोक मारुती येवले आणि ज्ञानेश्वर अर्जुन केदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी रविंद्र शेतसंधी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे बनावट पावती पुस्तक तयार करुन घेतले. त्यांनी संघटनेच्या नावावर पैसे घेऊन लोकांची फसवणूक केली. आरोपींनी मागील दीड वर्षापासून बनावट पावतीच्या आधारे अनेक लोकांकडून साडे तीन लाख रुपये घेतले असल्याची तक्रार रविंद्र शेतसंधी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेतसंधी यांनी तक्रार दिल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तिघांना गुरुवारी (दि.१७) अटक केली.

दरम्यान, आरोपींचे वकील अॅड. डॉ. चिन्मय भोसले यांनी हिंजवडी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता तिघांना अटक केली असल्याचा युक्तीवाद आज न्यायालयात केला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना आज जामीनावरती सोडले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like