ट्रक अडवून चालकाला लुटल्याप्रकरणी तिघांना अटक, तलाठी चौकशीसाठी ताब्यात

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – ट्रक अडवून चालकाला लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. रुपेश लालचंद पाटील, प्रदोष प्रमोद कोथिंबीरे, संदीप गोकुळ घोलप (सर्व रा. मुरबाड) अशी अटक कलेल्यांची नावे असून तलाठी नितीन घानेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून पंचवीस टन खाजगी गहू घेऊन एक एलपी ट्रक (एम.पी. 04 एच.इ. 3521) कर्जत येथे जात होता. यावेळी नारीवली सजाचे तलाठी नितीन घानेकर यांनी मुरबाड म्हसा नाक्यावर ट्रक अडवला व तपासणीसाठी तीन तास ट्रकचालकाला वेठीस धरले. तपासणीनंतर काही वेळाने ट्रक तेथून कर्जत कडे जात असताना रुपेश पाटील, प्रदोष कोथिंबीरे, संदीप घोलप या तिघांनी रात्री आकरा वाजता मुरबाड म्हसा दरम्यान शिरवली येथे ट्रक अडवला आणि चालक सादिक खान व क्लिनर गोलु यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले.

घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी तिघांना सकाळी अटक केली. व मुरबाड महसूल खात्याचे तलाठी नितीन घानेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लहांगे करीत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like