8 वर्षापुर्वी 3 बांगलादेशी बेकायदेशीररित्या भारतात आले, IMO App नं कुटूंबासोबत ‘गुप्तगू’, मुंबई पोलिसांनी केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साकी नाका पोलिसांनी तीन बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. ते आठ वर्षपूर्वी पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात घुसून आले होते आणि मुंबईत राहत होते. त्यांनी स्वतःला भारतीय असल्याचे सांगितले मात्र पोलिसांनी त्यांना IMO वरून त्यांच्या बांगलादेशातील परिवाराशी बोलताना पाहीले. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र मागितले.

साकी नाका पोलिसांनी केली होती अटक –
मुनीर शेख (44), सैफूल मुस्लिम (27) आणि अब्दुल हलीम (32) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. मुनीर शेख आणि सैफूल मुस्लिम मुंबईत वेल्डिंगचे काम करतात, तर हलीम फळांची विक्री करतो. डीसीपी अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे साकी नाका पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) या तिघांना बुधवारी रात्री अटक केली आहे.

चौकशी दरम्यान कसलेच उत्तर देता आले नाही –
वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले की, असामाजिक तत्व आणि संशयित म्हणून तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी टीमचे नेतृत्व एटीसी अधिकारी हनुमंत धवन यांनी केले. पकडलेल्या तिघांनी देखील आपण भारतीय असल्याचे सांगितले आहे. मात्र कोणताही आयडी प्रूफ किंवा समाधानकाराक उत्तर ते देऊ शकलेले नाही. पुढील सविस्तर तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी –
तीनही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/