पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकासह तिघांनी स्वीकारली लाच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विद्यार्थ्यांच्या गणवेश शिवणकामात लाच घेताना मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष व खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सायंकाळी रंगेहात पकडले. श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील स्वीकारण्यात आली.विशेषश बाब म्हणजे हि कारवाई श्रीराम पोलीस ठाण्यातचं घडली आहे

अटक केलेल्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक बाळासाहेब सोपान बरडे (वय 38), दादासाहेब छबुराव जगताप (वय 32, रा. खानापूर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष), राजेंद्र रामचंद्र आदिक (वय 45, रा.थत्ते मैदान श्रीरामपूर) या तिघांचा समावेश आहे. त्यांनी 11 हजार 500 रुपयांची लाच मागितली. त्यातील 8 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लाचेचे कारणातील तक्रारदार यांना खंदारे ट्रेडर्स श्रीरामपूर मार्फतीने जि. प.प्राथमिक शाळा खानापूर येथे मुलांसाठी गणवेश पुरविण्याचे काम मिळाले. त्या प्रमाणे तक्रारदार यांनी 106 गणवेश शाळेस पुरविले. प्रति गणवेश 300 रुपयेप्रमाणे शाळेकडून तक्रारदार यांना 31 हजार 800 रुपये अदा करण्यात आले आहे. परंतु, यातील आरोपींनी तक्रारदार यांना ‘तू प्रति गणवेश 165 रुपयांप्रमाणे पैसे घेऊन उर्वरित रक्कम 11 हजार 500 रुपये लाच म्हणून मागणी केली.

पैसे नाही दिले तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, अशी भिती घातली. लाच मागणी पडताळणीत यातील तिन्ही आरोपी यांनी तक्रारदार यांचे कडे पंच साक्षीदार यांचे समक्ष 11 हजार 500 रुपये लाचेची मागणी करून पैकी 8 हजार 500 रुपये लाच आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन येथे स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकाचे प्रमुख पोलीस उपाधीक्षक किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.