Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशातील तीन मोठ्या डॉक्टरांनी कोरोनाविरूद्ध लढाईसाठी लोकांना सल्ला दिला आहे. हे तीन मोठे डॉक्टर आहेत एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया, नारायणा हेल्थचे चेयरमन डॉ. देवी शेट्टी, आणि मेदांताचे चेयरमन नरेश त्रेहान. तिनही डॉक्टरांनी एकत्र येत सामान्य लोकांना सांगितले की, कोरोनाचा उपचार कसा करावा. जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळलात तर कोणती पावले उचलावीत. सोबतच रेमडेसिविरसह अन्य औषधांच्या प्रभावाबाबत सुद्धा त्यांनी चर्चा केली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान रेमडेसिविर औषधाच्या टंचाईमुळे चारही बाजूला गोंधळ उडालेला आहे. यावर एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, हे कोणतेही जादुचे औषध नाही. तर मेदांताचे चेयरमन नरेश त्रेहान यांनी म्हटले की, हा काही ’रामबाण’ नाही. हे औषध केवळ गरजू आजारी लोकांमध्ये वायरल लोड कमी करते.

ऑक्सीजन लेव्हल कमी असेल तर द्या लक्ष

डॉ. देवी शेट्टी यांनी म्हटले की, जर कुणाच्या शरीरात ऑक्सीजन लेव्हल 94 टक्केच्या वर आहे तर काहीही समस्येची बाब नाही. परंतु ऑक्सीजन स्तर यापेक्षा खाली आहे तर तुम्हाला डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे आवश्यक आहे की, योग्यवेळी योग्य उपचार मिळाले पाहिजेत.

जर तुमच्यामध्ये लक्षणे नाही तर डॉक्टर तुम्हाला घरी राहण्याचा सल्ला देतील. आणि प्रत्येक 6 तासांनी ऑक्सीजन लेव्हल चेक करण्याचा सल्ला देतील. डॉ. शेट्टी यांनी हे सुद्धा म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीला अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, अपचन, उलटीसारखी लक्षणे आहेत तर त्यांनी टेस्ट केली पाहिजे. ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे.

योग्य प्रकारे ऑक्सीजनचा वापर करा

तर नरेश त्रेहान यांनी म्हटले की, आज आपल्याकडे योग्य प्रमाणात ऑक्सीजन आहे, पण अट केवळ ही आहे की त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जावा. मला लोकांना सांगायचे आहे की, जर तुम्हाला ऑक्सीजनची आवश्यकता नसेल तर तो केवळ सुरक्षा म्हणून वापरू नका. अनावश्यक वापरामुळे गरजू लोकांना ऑक्सीजन मिळणार नाही.

काय म्हणाले एम्सचे डायरेक्टर

तर रेमडेसिविरबाबत एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, केवळ काही टक्के लोकांनाच याची आवश्यकता आहे. कोरोनाने संक्रमित सुमारे 85 टक्के लोक कोणत्याही विशेष उपचाराशिवाय बरे होत आहेत. बहुतांश लोकांमध्ये सामान्य लक्षणेच आहेत.