Drugs Case : तीन A ग्रेड अभिनेते NCB च्या रडारवर, S-R-A ने सुरू होतात नावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  बॉलीवुडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबी प्रत्येक अँगल तपासत आहे. मुंबईत छापेमारी करून, ड्रग्ज पॅडलर्सना अटक करून एनसीबी बॉलीवुडच्या ड्रग्ज मंडळींचा पर्दाफाश करण्यात गुंतली आहे. एनसीबीने अगोदरच ड्रग्ज प्रकरणात बी-टाऊनच्या मोठ्या हिरॉइनवर फास आवळला आहे. आता एनसीबीच्या रडारवर बॉलीवुडचे ए लिस्टर अ‍ॅक्टर्स आहेत.

एनसीबीच्या रडारवर मोठे हिरो

एनसीबीच्या सूत्रांच्या संदर्भाने आजतकने वृत्त दिले आहे की, बॉलीवुडच्या 2 ’सुपर स्टार’सह एकुण तीन ए ग्रेड अ‍ॅक्टर एजन्सीच्या रडारवर आहेत. तिघांपैकी दोन बॉलीवुडमधील आहेत, तिसरा अ‍ॅक्टर दुसर्‍या फिल्म इंडस्ट्रीतून असू शकतो. या अ‍ॅक्टर्सचे एनसीबीला इनपुट्स मिळाले आहेत. मात्र, अजून या अ‍ॅक्टर्सच्या नावांचा खुलासा झालेला नाही.

मात्र, त्यांच्या नावांची पहिली अक्षरे समजली आहेत. या अ‍ॅक्टर्सची नावे एस, आर, ए ने सुरू होत आहेत. एनसीबीचा दावा आहे की, सध्या या सर्वांच्याविरूद्ध पुरावे गोळा केले जात आहेत, पुरावा मिळताच अ‍ॅक्शन होईल.

यापूर्वी एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनवरून दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, रिया चक्रवर्तीच्या नावांचा खुलासा केला आहे. सर्वांचे ड्रग्ज चॅट समोर आले आहे. रिया चक्रवर्ती ड्रग्ज केसमध्ये जेलमध्ये आहे. तर दीपिका-सारा-श्रद्धा-रकुल यांना एनसीबीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीने दीपिका-सारा-श्रद्धा यांचे मोबाइल फोनसुद्धा जप्त केले आहेत. तिघींच्या फोनमधून डिलीट केलेला डेटा रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एनसीबीला अपेक्षा आहे की, या अ‍ॅक्ट्रेसेसच्या फोनमधून एजन्सीला खुप मदत मिळेल. बॉलीवुडच्या ड्रग्ज रॅकेटच्या खुलाशांनी अनेकांना अस्वस्थ केले आहे. त्यांचा आरोप आहे की, ही सर्व बॉलीवुडला बदनाम करण्याची मोहिम सुरू आहे. काही कलाकारांमुळे संपूर्ण बॉलीवुडचे नाव खराब होत आहे. आता या प्रकरणात आणखी कुणाची नावे येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.